एस. एम. बी. टी.हॉस्पिटल धामणगाव ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे 84 मरणोत्तर देहदानदिनांक 24/2/2025 जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील कावूनई येथील कै. कमळाबाई गोविंद गुंड, वय वर्ष 76यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान केले. संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे 84 वे मरणोत्तर देहदान आहे.
कै. कमळाबाई गोविंद गुंड पाटील यांचा मृतदेह एस. एम. बी. टी.हॉस्पिटल धामणगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे रात्री 1 वा सुपूर्द करण्यात आला.यावेळीनातेवाईक पंढरीनाथ गोविंद पाटील (मुलगा) , निवृत्ती गोविंद पाटील(मुलगा), सुशीला अर्जुन जाधव (मुलगी) , वत्सलाबाई पंडित केदारे(मुलगी), सुनीता शिवाजी राव(मुलगी) , सुमनबाई पंढरीनाथ पाटील(सून),विमल निवृत्ती पाटील(सून),अर्जुन मुरलीधर जाधव(जावई), पंडित रानुजी केदारे(जावई) , शिवाजी चंदर रावं(जावई) त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा कमिटीचे उत्तम कोंबडे,संदिप खंडारे,योगेश शिरसाठ,संदिप देवरे,संतोष थोरात,नागेश भुसेकर,मयुर चुंबळे व इगतपुरी तालुका कमिटीचे राजेंद्र उदावंत,लक्ष्मण मालुंजकर,केशव तोकडे,तुषार अंदाडे,युवराज लंगडे,शशिकांत धनु,भगवान घोरपडे,रोहन घोरपडे,ज्ञानेश्वर पवार,गोपाळ तोकडे,गजाराम आघान ,प्रतीक जाचक ,रंगनाथ वरुंघुशे, सामाजिक प्रमुख तसेच स्वस्वरुप संप्रदायाचे भक्त मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी एस. एम. बी. टी हॉस्पिटल धामणगाव ता. इगतपुरी चे सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
जगद्गुरू श्रींनी त्यांच्या संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. तसे अर्ज भरून संस्थांनकडे दिले. त्यांनी ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले आहेत.त्यातील 84जणांनी आत्तापर्यंत मरणोत्तर देहदान केले आहे. गुरूंवरील निष्ठा आणि गुरुंवरील प्रेम यामुळेच जगद्गुरुश्रींचे अनुयायी मरणोत्तर देह दान करत आहेत.
