काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी)
सापगाव आदिवासी विविध विकास सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी समाधान देवराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.या प्रसंगी सर्व मान्यवरांसमवेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तळेगावचे उपसरपंच भागवत गांगुर्डे यांनी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देत सोसायटीच्य कामात बदल घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाधान शिंदे यांचे कार्य पाहता त्यांना त्यांच्या नवीन पदभार व कामकाजासाठी शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते. त्यात तळेगावचे उपसरपंच भागवत गांगुर्ड, पत्रकार काळू गांगुर्डे, निवृत्ती बोडके, भगवान गांगुर्डे, प्रकाश गांगुर्डे, भास्कर जाधव, भास्कर आंबापुरे, आनंदा तूप, लोंढे, सचिन भोसले, विलास दिवे, तसेच दशरथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे आभार मानत आपल्याला मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून आपण योग्य पद्धतीने काम करणार व समाजसेवा करणार असल्याचे विकास सोसायटीचे नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन समाधान देवराम शिंदे यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या निवडीमुळे सोसायटीच्या विकास कार्यांना एक नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
