मोडाळे ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. केशव आण्णा बोडके यांच्या नेतृत्वाखाली श्री.गोरख विठ्ठल गोऱ्हे यांची मोडाळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली . या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री.गणेश ढोन्नर, सुरेश लहांगे,सौ.सीताबाई जगताप,सौ.वनिता गोऱ्हे, काजल बिन्नर या सर्व सदस्यांनी श्री गोरख गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करून दिली . घोटी गटाचे विकासपुरुष मा. जयाभाऊ जाधव, माजी सभापती श्री.गोपाळजी लहांगे, घोटी बाजार समिती संचालक मा.दिलीप भाऊ चौधरी, प्रदेश संघटक सचिव उमेशभाऊ खातळे, सामाजिक कार्यकर्ते खंडुभाऊ परदेशी या सर्वांनी भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. निवडणूक वेळी विठ्ठल जगताप,दगडू सदगीर,देवराम गोरे व केशव आण्णा फ्रेंड सर्कलचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
केशव आण्णा बोडके यांच्या नेतृत्वाखाली श्री.गोरख विठ्ठल गोऱ्हे यांची मोडाळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड
Oplus_131072
