इगतपुरी (जि. नाशिक) येथे महाराष्ट्रातील एकमेव आणि ऐतिहासिक असा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 27 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 10 फूट उंच ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा आणि 11 फूट उंचीचा चबुतरा अशा एकूण 21 फूट उंच स्मारकाचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या पुतळ्याचे निर्माण 99% निधी रमाईच्या दानशूर लेकींकडून, लोकवर्गणीतून एक लाख आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या “धम्म दान” द्वारे करण्यात आले.
हा ऐतिहासिक सोहळा 11 एप्रिल 2025 रोजी, क्रांतिवीर महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. सुशीला शंकर डांगळे होत्या. या वेळी “मी सावित्रीबाई बोलते” या एकपात्री नाट्यप्रयोगाने उपस्थितांचे मन जिंकले. नाट्य प्रयोग आयु. महानंदा डाळिंबे, आयु. स्नेहा महेंद्र साळवे आणि आयु. निशा केदारे यांनी सादर केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. दीपश्री माने बलखंडे यांनी केले. प्रमुख पाहुणे मा. अझर भाई शहा (येवला) यांनी भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांवर उद्बोधन केले. आयु. बाळकृष्ण कचरू केदारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संविधान यामधील ऐतिहासिक समन्वयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.कार्यक्रमात 42 दानशूर महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिलेला पैठणी साडी, निळा फेटा आणि सुगत बुद्ध विहार इगतपुरीचे छायाचित्र असलेले पदक देण्यात आले. या सन्मानप्राप्त महिलांमध्ये नाशिक, मुंबई, बुलढाणा आणि इगतपुरी परिसरातील रमाईच्या लेकींचा समावेश होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामध्ये चंद्रकांत गाडे, भास्कर देहाडे, शरद शिंदे, मिलिंद हिरे, पंकज बर्वे, अर्जुन चंद्रमोरे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.या ऐतिहासिक उपक्रमामुळे रमाईच्या लेकींची समर्पण भावना, आंबेडकरी विचारांचे संवर्धन आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश महाराष्ट्रभर पसरला आहे.
त्या पुढील प्रमाणे
1) निशा बाळकृष्ण केदारे सोग्रास नाशिक
2) शारदा चंद्रकांत गाडे इगतपुरी
3) पद्मा पंडित दिवे इगतपुरी
4) रोहिणी अनिल बर्वे नाशिक
5) ललिता मदन जाधव इगतपुरी
6)नंदिनी भास्कर बर्वे इगतपुरी
7)वत्सलाबाई पांडुरंग तिवडे नाशिक
8)प्रीती चंद्रकांत शिरसाट इगतपुरी
9) पद्मा सीताराम भरीत इगतपुरी
10) मालती भास्कर देहाडे इगतपुरी
11) सुरेश संपत अंबोरे गोवंडी मुंबई
12) वैशाली विलास इंगळे इगतपुरी
13) गीता मगन शिंदे नाशिक
14) मंदा गोविंद बर्वे धामणगाव
15) राहीबाई बंडुजी पवार.इगतपुरी
16) मंदा बाई अर्जुन जगताप नांदगाव.सदो.
17) विद्या धनंजय माने बुलढाणा
18) कल्पना गोपाळ दिवेकर(देहाडे) घोटी
19) मीराबाई एकनाथ भडांगे टिटोली
20) संगीता विलास शिंदे इगतपुरी
21) कल्पना मधुकर जगताप इगतपुरी
22) बुद्ध धातू कलस पदयात्रा संघ थायलंड 2023
23).संकल्प वेल्फअर ट्रस्ट (टी सी) म. रे मुंबई विभाग
24) करुणासागर रमाई फाउंडेशन इगतपुरी
25) अनिता मिलिंद हिरे इगतपुरी
26) संतोष (बाली) रमेश बर्वे इगतपुरी
27) जिजाबाई नवसू शिंदे इगतपुरी
28) जनाबाई चिंधू निकम नाशिक
29) लताबाई मधुकर जाधव इगतपुरी
30) रोहिणी भीमराव शिंदे इगतपुरी
31) मंगला गंगाधर शिंदे मुंबई
32) राजश्री विजय मनोहर इगतपुरी
33) राणी शरद शिंदे इगतपुरी
34) शितल अर्जुन चंद्रमोरे इगतपुरी
35) छाया मिलिंद जगताप खैरगाव
36) जनाबाई अंकुश शिंदे इगतपुरी
37)आरती सतिश साबळे इगतपुरी
38) प्राजक्ता राजेंद्र दोंदे इगतपुरी
39) रजनी गजेंद्र बर्वे धामणगाव
40 )शांताबाई निवृत्ती बर्वे नागपूर
41) कलावती रामा उबाळे कल्याण
42) पंकज सुरेश बर्वे इगतपुरी
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.भास्कर बर्वे करीत असताना आयु महेंद्र वामन साळवे,मुख्य अभियंता,आयु.विक्रम मनोहर अभियंता, आयु.बाळकृष्ण केदारे मुख्य अभियंता याचा विशेष सन्मान करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यात पुढील सहकाऱ्यांची उपस्थिती मुख्य होती.
चंद्रकांत गाडे भास्कर देहाडे,.शरद शिंदे, विलास शिंदे, भीमराव शिंदे, मधुकर जाधव, मिलिंद हिरे, संतोष बर्वे, श्रीरंग पवार, पंकज बर्वे, गणेश सोनवणे, चेतन खंडीझोड, अर्जुन चंद्रमोरे ,अशोका पवार,विलास इंगळे,सीताराम भरीत आणि इतर सहकारी होते.
