इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज समर्थ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री मेडीकलच्या नवीन इमारतीचा भव्य शुभारंभ रविवार, दि. २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार आहे.या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मा.ना. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि मा.ना. नरहरी झिरवाळ (अन्न व औषध प्रशासन मंत्री) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये मा.आ. छगनरावजी भुजबळ, मा. प्रकाशराव आबिटकर, मा.आ. राजाभाऊ वाजे, मा. हेमंत आप्पा गोडसे, मा.आ. सत्यजीतदादा तांबे, मा.आ. राहुलभाऊ ढिकले, मा.ना. माणिकराव कोकाटे, मा.डॉ. सौ. मेघना बोर्डीकर व अन्य अनेक खासदार-आमदार व मंत्री मंडळी यांचा समावेश आहे.या उद्घाटन सोहळ्याचे आयोजक व निमंत्रक डॉ. अमन नायकवडी, डॉ. अंजुम नायकवडी , डॉ. महेंद्र ज्ञानेश्वर शिरसाट (पाटील) , डॉ. दत्ता बाळासाहेब सदगिर , डॉ. घनश्याम पंढरीनाथ बन्हे, डॉ. सुनिल मारुती बुळे, डॉ. सविता सुनिल बुळे, डॉ. शैलेश विलासराव देशपांडे,डॉ. योगेश्वर देवीदास भागडे, डॉ. सत्यवान बाळू रोकडे, डॉ. प्रियंका राहुल वाडेकर-चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर्स असोसिएशन, पत्रकार बांधव आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.वैद्यकीय क्षेत्रात नवा टप्पा गाठणाऱ्या या उपक्रमामुळे इगतपुरी व परिसरातील रुग्णांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा आता अधिक सुलभ व सुलभ दरात उपलब्ध होणार आहेत.
