मिलिंद सोनवणे (इगतपुरी प्रतिनिधी)
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील विहिरी, तलाव व नळपाणी योजनांमध्ये गढुळपणा निर्माण झाला आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात जुलाब, उलट्या व पोटदुखीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. डॉक्टर व आरोग्य विभागाकडून सतत सूचना दिल्या जात असून, नागरिकांनी फक्त उकळून आणि गाळूनच पाणी प्यावे, असा सल्ला दिला जात आहे.
नांदडगाव येथे विहिरीच्या पाण्यात गढुळी झाल्याने काही रुग्णांत उलटी-जुलाब आढळून आले. मात्र, या घटनेवरून सोशल मीडियावर “विषबाधा झाली”, “विहिरीत जंतू पडले” अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या तपासणीनुसार या प्रकारात कोणतीही विषबाधा झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत खात्याच्या सूचनांनुसारच वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे
संपूर्ण इगतपुरी तालुक्यात अशा प्रकारचे रुग्ण आढळत असून, पावसाळ्यात स्वच्छता राखणे व पाणी उकळून पिणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
