निलेश चव्हाण (सातपूर प्रतिनिधी), १८ जून २०२५ —अशोकनगर येथील इंग्रजी माध्यमाच्या मॉडर्न स्कूल प्राथमिक विभागातील इयत्ता दुसरीच्या ९ विद्यार्थ्यांनी CPS Olympiad Exam मध्ये प्रथम श्रेणीत उत्तम यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच त्यांच्या वर्गशिक्षिका सौ. संगिता चव्हाण यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत त्यांनी सातत्यपूर्ण सराव व अभ्यासाचे नियोजन यावर भर दिला.
यशस्वी वाटचालीत संस्थेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सारिका जाधव यांचेही मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले. त्यांनी या परीक्षेसाठी शाळेच्या पातळीवर आवश्यक त्या सुविधा व अभ्यासाचे वातावरण निर्माण करून दिले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण मॉडर्न स्कूल परिवारात आनंदाचे वातावरण आहे. शाळेचे संस्थापक, पालक व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
