आहुर्ली: दिनांक 14 जून 2025 रोजी आहुर्ली परिसरात एक भीषण अपघात घडला. त्र्यंबक आहुर्ली मार्गावरून नाशिककडे येणाऱ्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार (क्र. MH-41-AS-6521) पलटी झाली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघात होताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या गोंदे फाटा येथील मोफत रुग्णवाहिका घटनास्थळी धावून आली. सर्व जखमींना तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे: 1)निर्मल अनिल थोरात (वय 18) 2)यश संतोष आढाव (वय 18) ३)ओम भानुदास चोपडा (वय 21) 4)प्रथमेश ढाके 5)यश पालवे 6) मेहुल चावरिया 7)रितेश कदम 8)वेदांत मुळे
सर्व जण नाशिक येथील आडगाव, बळीराम मंदिर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.
या अपघाताची प्राथमिक माहिती अशी की, आहुर्ली गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. अपघाताची अधिक चौकशी संबंधित पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे.
या अपघातात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेने दाखवलेली तत्परता व सेवा विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
आपल्या सुरक्षेसाठी वाहन चालवताना नेहमी सतर्क रहा.वाहनचालक व प्रवासी यांना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
