नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२८: तारीख निश्चित! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक

बातमी शेअर करा.

नाशिक, १ जून २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध आखाड्यांचे साधू-महंत यांच्या साक्षीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२८ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी कुंभमेळ्याच्या अधिकृत तारखा जाहीर करण्यात आल्या.

सिंहस्थ पर्वाची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामकुंड, पंचवटी येथे ध्वजारोहणाने होणार असून, हा अध्यात्मिक महासोहळा २४ जुलै २०२८ पर्यंत सुरू राहणार आहे.

मुख्य अमृतस्नान दिनांक पुढीलप्रमाणे:

नाशिक कुंभमेळा

प्रथम अमृतस्नान: २ ऑगस्ट २०२७ (आषाढ सोमवती अमावस्या)

द्वितीय अमृतस्नान (महाकुंभस्नान): ३१ ऑगस्ट २०२७ (श्रावण अमावस्या)

तृतीय अमृतस्नान: ११ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद शुद्ध एकादशी)

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६,

प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७, आषाढ सोमवती अमावस्या.

महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रावण अमावस्या

तृतीय अमृतस्नान: १२ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद शुद्ध द्वादशी – वामन द्वादशी)

या वेळी एकूण ९७ पर्वस्नान मुहूर्त जाहीर करण्यात आले आहेत – नाशिकसाठी ४४ तर त्र्यंबकेश्वरसाठी ५३. अमृतस्नानांव्यतिरिक्त एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, योगदिवस भाविकांसाठी विशेष पर्व ठरणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “या वेळी वेळ हातात असल्यामुळे तयारी अधिक व्यापक आणि सुसंघटितपणे होईल.”

बैठकीला श्री रामानंद निर्मोही आखाडा, महानिर्वाणी आखाडा, पंच अग्नी आखाडा आदींसह अनेक साधू-महंत, तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *