माणिकखांब गावातील वीज समस्यांवर उपाययोजना सुरू — अभियंता सरोदे यांच्याकडून तत्काळ प्रतिसाद

Oplus_0

बातमी शेअर करा.

इगतपुरी: माणिकखांब गावात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या वीज समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वीज महावितरण कंपनीचे अभियंता सरोदे साहेब आज गावात स्पॉट व्हिजिटसाठी दाखल झाले. गावातील विविध वीज समस्यांबाबत ग्रामस्थांनी त्यांना निवेदन सादर केले.

या वेळी गावचे सरपंच शाम चव्हाण, आगरी समाज विश्वस्त कार्यकारिणीचे सचिव भोलेनाथ चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील पगारे, सामाजिक कार्यकर्ते वसंत चव्हाण, ऍड. सोपान चव्हाण, रतन भटाटे, निवृत्ती चव्हाण, काळु चव्हाण, गोपीनाथ चव्हाण, दशरथ भटाटे, आनंद भटाटे तसेच माजी सदस्य शाम चव्हाण आणि वायरमेन ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांनी पुढील मुख्य समस्या मांडल्या:

गावातील जिर्ण झालेल्या इलेक्ट्रिक पोल्स त्वरित बदलण्यात यावेत

कमी पॉवरच्या गटुंच्या जागी अधिक क्षमतेचे रोहित्र (Distribution Transformer) बसवावे

SC व ST कॅटीगिरीतील नागरिकांसाठी स्वतंत्र डिपीची मागणी, जातीचे दाखले संकलित करून प्रस्ताव सादर करणे

गेटकडील डिपीवर अतिरिक्त लोड कमी करण्यासाठी नवीन डिपी बसवणे

थ्री-फेज लाईनसाठी मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करणे

गावात लबरी वायरचे जाळे टाकणे जेणेकरून चोरीचा वीज वापर थांबवता येईल

या निवेदनावर अभियंता सरोदे साहेबांनी तत्काळ वायरमनना सूचना देऊन सर्व बाबींचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, झाडांमुळे होणाऱ्या अडथळ्यांसाठी झाडे तोडण्यात येतील आणि थ्री-फेज लाईनच्या कामासाठी ठेकेदाराशी तातडीने संपर्क साधला जाईल.

ते पुढे म्हणाले की, “गावात वीज चोरी रोखण्यासाठी प्रत्येक घरावर लक्ष ठेवले जाईल आणि चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”गावातील नागरिकांनी अभियंत्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले असून, लवकरच या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *