“हॉटेल हिरवी मिरची: जेवण, निसर्ग आणि स्नेहाचा संगम”

बातमी शेअर करा.

मिलिंद सोनवणे :इगतपुरी प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे बी.एस. MCJ (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेवटच्या पेपरनंतर स्नेहभोजनाचे आयोजन केले. या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत सांजेगाव येथील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या हॉटेल हिरवी मिरची येथे स्नेहभोजनाचा मनमुराद आनंद लुटला.

हॉटेल हिरवी मिरचीचे संचालक श्री लकी भाऊ गोवर्धने यांनी या कार्यक्रमासाठी उत्साहपूर्वक सहकार्य करत सर्व उपस्थितांचे मन जिंकले. मुकणे धरणाच्या सानिध्यात वसलेले हे हॉटेल इगतपुरी तालुक्यातील एक खास ठिकाण मानले जाते. येथील खासियत म्हणजे उत्तम चविष्ट जेवण आणि खास मिरचीचा ठेचा, जो येथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये ॲड. चंद्रशेखर गीते सर, प्राध्यापक अहिरे सर, श्री राहुल सोनवणे, माजी सभापती रोहिदास गोवर्धने, पत्रकार सुमित बोधक, पत्रकार मिलिंद सोनवणे, प्रितेश जगताप, छायाचित्रकार ज्ञानेश्वर गांगुर्डे, श्री सुधीर येलवे सर, करन अहिरे आणि प्रतीक सोनवणे यांचा समावेश होता

संपूर्ण कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी हॉटेल हिरवी मिरची येथील अतिथी सेवा आणि खाद्यसंस्कृतीचे भरभरून कौतुक केले. एकदा तरी या हॉटेलमध्ये येऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा, असा संदेश सर्वांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *