जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत द्वितीय क्रमांक

बातमी शेअर करा.

(हरीश तूपलोंढे प्रतिनिधी)

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक २०२४-२५ आज दि. ४ फेब्रुवारी रोजी मीनाताई ठाकरे  स्टेडियम नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. लहान वयोगटातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम लक्ष वेधून घेणारे होते. या आयोजित अध्यक्ष चषकमध्ये समूह गीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा बेझे या शाळेने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला असून सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *