मुला बाळांना व बायकांना त्याच्या नजरकैदेत ठेवतो; मालकाविरुध्द इंदापुरमध्ये वेठबिगार तक्रार दाखल

बातमी शेअर करा.

इंदापूर येथे वेठ बिगार कामगारांवर छळ करून नजरकैदेत ठेऊन काम करून घेण्याचा प्रकार घडला असता. इंदापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

श्री सयाजी भंडलकर रा गिरवी ता. इंदापूर यांच्या कडे कोळसा बनवण्याच्या कामात काम करत असलेल्या वेठबिगार कामगार त्यांच्या कुटुंब सह होते.कामाच्या ठिकाणी कामगारांना वेळोवेळी छळ, शारीरिक मारहाण, शिवीगाळ आणि इतर अत्याचार सहन करावे लागले.कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला, ज्यामुळे स्थानिक श्रमजीवी संघटनेला मदतीसाठी संपर्क केला असता विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनात खाली इंदापूर पोलीस स्थानकात भारतीय न्याय अधिनियम २०२३ नुसार कलम 118(1), 115(2) व बंधबिगार अधिनियम 1976 नुसार कलम 16,17,18,19 फिर्याद नोंदविण्यात आली आहे. यावेळी संजय शिंदे ना.जि.सरचिटणिस , गोकुळ हिलम इगतपुरी ता.अध्यक्ष, रमेश वाघमारे (जिल्हा रायगड), कृष्णा जाधव ( जिल्हा रायगड) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *