नाशिक, ६ फेब्रुवारी:
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU), नाशिक यांच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट टर्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ६ फेब्रुवारी रोजी खेळाडूंची निवड लिलाव प्रक्रियेद्वारे करण्यात आली. संघमालकांनी आपल्या संघांसाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी ठराविक पॉइंट्सचा वापर करत संघ बांधणी केली. ही अनोखी निवड प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक आणि रणनीतीपूर्ण ठरली असून, संघमालकांनी खेळाडूंच्या कौशल्य, अनुभव आणि कामगिरीच्या आधारे पॉइंट्स वापरून संघ मजबूत करण्यावर भर दिला.
रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये या स्पर्धेचा मोठा उत्साह असून, येत्या काही दिवसांत रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत.या स्पर्धेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाविषयीची आवड वाढवण्यासह संघभावना आणि मैत्री वृद्धिंगत होणार आहे. खेळाडूंच्या निवडीसाठी लिलाव पद्धतीचा अवलंब केल्यामुळे स्पर्धेला अधिक रोमांचक स्वरूप प्राप्त झाले आहे.
स्पर्धेचे आयोजक NRMU सचिव कॉम कुंदन महापात्रा, व्यवस्थापन सचिव नाना सोनवणे, राकेश पलारीया साहेब, कॉम संदीप सांगळे, मुकुंद शिंदे, अजय डिंगिया, अमोल ठोंबरे,विठ्ठल दराडे,राज दिवटे सचिन आहेर साहेब,नितीन ठाकरे,कैलास बोडके .आयोजकांनी सांगितले की, स्पर्धेसाठी व्यवस्थित नियोजन, उत्तम मैदान आणि योग्य पंच व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडू आणि संघांची अंतिम नावे लवकरच जाहीर केली जातील. स्पर्धेच्या पुढील सामन्यांचे वेळापत्रक आणि अधिक तपशील लवकरच उपलब्ध होतील. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये या स्पर्धेबद्दल मोठी उत्सुकता असून, येत्या काही दिवसांत क्रिकेटचा हा महोत्सव रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी संदीप सांगळे यांनी आभार मानले..
