इगतपुरी
नुकत्याच मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे झालेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक वैयक्तिक नृत्य स्पर्धेत जि प शाळा मालुंजे ता.इगतपूरी येथील विशेष गरजा असलेली विद्यार्थीनी कु. समृद्धी सोपान गायकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
एक दिव्यांग (अपंग) विद्यार्थीनी असुन देखील जिल्हा स्तरावर दैदीप्यमान नृत्य करून सर्वांचेच मन जिंकून घेतले. उत्कृष्ट नृत्य सादर केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. नितीन बच्छाव , निलेश पाटील गटशिक्षणाधिकारी इगतपूरी ,अशोक मुंढे शिक्षण विस्तार अधिकारी गोंदे बीट, कमलाकर शिंदे केंद्रप्रमुख वाघेरे, मनिषा मगर मुख्याध्यापिका मालुंजे, दत्तु कुलाल , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गायकर उपाध्यक्ष निशाताई गायकर सर्व ग्रामस्थ तसेच सर्व तालुकास्तरीय टीम श्रीउत्तम आंधळे विशेष तहा, स्मिता खोब्रागडे विशेष तज्ज्ञ, संजय पाटील, बाप्पा गतीर ,संदीप शिरसाठ निलसी शेलार, मिलम पवार विशेष गटसाधन केंद्र पंचायत समिती इगतपूरी यांनी अभिनंदन केले. शिक्षण प्रेमी आकाश शरद गवळी यांनी विद्यार्थीनी व शाळेचे अभिनंदन केले.
