अँड सोपान बंडू चव्हाण यांचा दिनांक ७ मार्च रोजी स्वानंद वारकरी शिक्षण संस्था व गुरुकुल बलायदुरी, इगतपुरी येथे विध्यार्थ्यांना अन्नदान सेवा करून वाढदिवस साजरा केला. स्वानंद वारकरी शिक्षण संस्था शालेय शिक्षणासह संस्कार शिक्षण गोरगरीब मुलांपर्यंत पोहचवणे त्याच प्रमाणे राष्ट्रसेवक, समाजसेवक, मातृपितृसेवक तयार करणे या अनुषंगाने कामकाज चालते.संस्थेत 45 विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना अन्नदान करून आपला वाढदिवस साजरा करावा या हेतूने ठाणे जिल्हा वकील संघटनेचे चेअरमन अँड सोपान बंडू चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी ह.भ.प. भगीरथ महाराज भटाटे , माजी सभापती विष्णुपंत चव्हाण, संजय भटाटे, संतोष चव्हाण , रमेश चव्हाण , नामदेव भटाटे, सोमनाथ कौदरे , ज्ञानेश्वर चव्हाण , ज्ञानेश्वर वासुदेव चव्हाण, चंद्रकांत कौदरे, गोपाळ भटाटे, प्रल्हाद तात्याबा भटाटे , भोलेनाथ चव्हाण , गुरुनाथ चव्हाण , ज्ञानेश्वर भटाटे , निवृत्ती चव्हाण , रामदास पुंडलिक चव्हाण, रवी चव्हाण , मछिंद्र खडके , राहुल चव्हाण, श्रावण शिद, विश्राम पगारे ,किशोर पगारे आदी उपस्थित होते, यावेळी भागवताचार्य ह. भ. प. श्री विजय महाराज चव्हाण यांनी आभार व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अँड .सोपान बंडू चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न; स्वानंद वारकरी शिक्षण संस्था व गुरुकुल बलायदुरी येथे केले अन्नदान
