जय भिम पॅथर एक संघर्ष सिनेमाचे कलाकार दिग्दर्शक सिने अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर यांची माणिकखांब गावात सदिच्छा भेट दिली. लोकराज्य प्राईम न्युज चे संपादक सुनील धर्माजी पगारे यांनी चर्चा केली.11 एप्रिल पासून जय भिम पॅथर एक संघर्ष संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. दिग्गज कलाकारांच्या प्रतिभेतून साकार झालेला चित्रपट, ज्यात आहे समाजातील प्रत्येक संघटनेची गोष्ट, जी तुमच्या मनात नक्कीच घर करून जाईल…! असे आवाहन सिने अभिनेते चिन्मय दादा यांनी केले आहे त्यांचे स्वागत वकील संघटना ठाणे चेअरमन माणिकखांब गावचे भुमिपुत्र ऍडव्होकेट सोपान बंडू चव्हाण यांनी केले.
उपस्थित राष्ट्रवादी सरचिटणीस सुधारकजी जगताप, गोपाळ भटाटे, सुरेश चव्हाण , नामदेव भटाटे, भाऊ भटाटे, शंकर भटाटे ,सुरेश मनोहर चव्हाण, किशोर पगारे, धनंजय पगारे आदि उपस्थित माणिकखांब ग्रामस्थ सर्वाचे आभार बंटी पगारे वृक्ष प्रेमी दारणामाई सेवक इगतपुरी तालुका यांनी मानले.
