पंचवटी एक्सप्रेस मध्ये MST च्या वतीने भीम जयंती साजरी

बातमी शेअर करा.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी मंगलवार, दि.२२/०४/२०२५ रोजी मा.संजयभाऊ भालेराव (उपाध्यक्ष) यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनात डाऊन च्या मनमाड मुंबई पंचवटी सुपर फास्ट एक्सप्रेस या रेल्वे गाडीच्या डी – १३ या MST कोच मध्ये नाशिक जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना (महाराष्ट्र रजि. नं.१५८०) पासधारकांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वात प्रथम MST पासधारकांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प – दिप – धुप पूजन करण्यात आले. त्रिसरण पंचशील व भिमस्मरण, भिमस्तुती बौद्धाचार्य आयु.मनोज मोरे गुरुजी ह्यांनी घेवुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सदर रेल्वे कोच मधिल एकंदर ५०० प्रवासी तसेच पासधारकांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. नाचुन – गावुन अत्यंत जल्लोषात आनंदात जयंती साजरी करण्यात आली.

हा भीम जयंती जल्लोष कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.संजय भालेराव (उपाध्यक्ष) , बाळासाहेब केदारे, सुनिल भरीत, राजुभाऊ भागडे, शरद पंडित, संदिप पंडित, आकाश पवार, बाळा कदम, नामदेव सोपनार, दिलीप कांबळे, राजेंद्र जगताप, आनंद मुकणे, राकेश धाडीवाल, मनोज कदम, गजानन गायधनी, प्रशांत शिरसाठ, सुधीर मोरे, बळवंत उगले, मयुर पवार, मंगेश मुदगण, विनोद जाधव, कुंदन पंडित, गरुड, अक्षय पवार, गौरव चौधरी, प्रभाकर जाधव, कपिल उबाळे, अक्षय भडांगे, साधनाताई दहिवले, भारतीताई सोनवणे, दीपा जमादार, सुचित्रा नारकर, कीर्ती पाटील अर्चनाताई, प्रियंकाताई, प्रिया जगताप, सुनिता गरुड, योगिता बर्वे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *