संघर्षातून उभा राहिलेला हिरो : इगतपुरीच्या बंटी पगारे यांना ‘रत्न गौरव पुरस्कार’, झाडांपासून अभिनयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Oplus_131072

बातमी शेअर करा.

जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि निसर्गप्रेम या चार गोष्टींवर आधारित एक संघर्षमय पण प्रेरणादायी जीवनगाथा म्हणजेच माणिकखांब येथील बंटी धनंजय पगारे उर्फ बंटी दारणामाई सेवक. आर्थिक अडचणींचा सामना करत, जीवनाच्या अनेक वळणांवर अपयशाचे चटके सहन करत बंटीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील आदिवासीबहुल भागात, माणिकखांब या लहानशा गावात जन्मलेला बंटी एका अत्यंत गरिब कुटुंबातून येतो. शिक्षणाची आवड असूनही आर्थिक अडचणीमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण यामुळे त्याचा आत्मविश्वास ढळला नाही. २०१८ साली केवळ ५० रुपयांवर रोजंदारीवर तानाजी चहा स्टॉलवर काम करताना सुरूवात केली. त्यानंतर पडघा टोल प्लाझावर पॉपकॉर्न, पाणी बाटल्या, काकडी विक्री करताना त्याने जगण्याची लढाई चालू ठेवली.याच टोल प्लाझावर एक दिवस सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांची अचानक भेट झाली, आणि त्या एका सेल्फीने बंटीच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्यांच्या प्रेरणेतून बंटीने चिन्मय दादा फाउंडेशन ची स्थापना केली आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले.

“एक झाड, एक मित्र” उपक्रमाद्वारे पर्यावरणप्रेम जागवणं, गोदामाई स्वच्छता अभियान आणि दारणामाई नदी स्वच्छता मोहिम राबवून बंटीने परिसरात आपली वेगळी छाप पाडली.आज बंटी पगारे हे केवळ सामाजिक कार्यकर्ता नाही, तर अभिनय क्षेत्रातही आपले पाय रोवत आहेत. ‘प्रीतीचा वणवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील मालिकेत त्यांनी गावकरी, हारवाला, फुगेवाला अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. आज ते खुद्द चिन्मय उदगीरकर यांच्या प्रॉडक्शनमध्ये काम करत आहेत.एकेकाळी “तुला कोण ओळखतो?” असं म्हणणारेच आज “बंटी पगारे? ओळखतोच!” असं अभिमानाने म्हणतात.

इगतपुरी रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित झालेला बंटी हा आजच्या तरुणांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *