रायगड नगरजवळ मोटरसायकल अपघात — दोन जण गंभीर जखमी, नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत ॲम्बुलन्सची तत्काळ मदत

बातमी शेअर करा.

गोंदे फाटा, दि. 23 जुलै 2025 (बातमी प्रतिनिधी):नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावर रायगड नगरजवळ आज रात्री सुमारे आठ वाजता भीषण मोटरसायकल अपघात झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ही मोटरसायकल मुंबईहून नाशिककडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक MH 15 KB 8579 असून, अपघात स्थळ म्हणजेच रायगड नगर जवळ मोटरसायकल घसरल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दीपक दौलत गोहीरे (वय 36, रा. रायगड नगर),सुभाष देवराम वाघमारे (वय 42, रा. राजूरा बहुदा) अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान गोंदे फाटा येथील मोफत ॲम्बुलन्स सेवेद्वारे त्यांना नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *