(ता. इगतपुरी) प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील खडकेद येथील आदिवासी विद्या प्रसारक समाज, घोटी बुद्रुक शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये नाशिक जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, मा. जी. पं. सदस्य बाळासाहेब गाढवे, इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, संतोष भोसले, सोशल मीडिया प्रमुख किरण मुसळे, गटप्रमुख वसंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, दूंदा जोशी, मुख्याध्यापक सुरेश निगळे, संतु भालेराव, तुषार देवरे, योगेश नाठे, संजय काळे, भरत वाघ, पंढरीनाथ धोंगडे, ईश्वर बच्छाव, विठ्ठल खतेले, राजेश मोहिते, भाऊराव रोंगटे, अधिक्षिका शुभांगी पाटील, प्रवीण धादवड, गोरख जाधव, उल्हास वाघ, वर्षा नाथ, नंदा अकोटकर, शाळेचे शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाऊराव रोंगटे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुरेश निगळे यांनी केले.
या वाढदिवस सप्ताहानिमित्त आ. हिरामण खोसकर यांच्या सहकार्यातून इगतपुरी तालुक्यात १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.याच सप्ताहात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये -▪️ आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व उपचार शिबिरे▪️ रक्तदान शिबिरे▪️ महिला बचत गटांसाठी सुरक्षितता, आरोग्य, रोजगार व शासकीय योजना मार्गदर्शन▪️ शेतकऱ्यांना पीक विमा व शासकीय योजना याबाबत माहिती▪️ रुग्णालयांमध्ये फळवाटप▪️ “गाव तिथे वृक्ष” अभियानया विविध कार्यक्रमांमुळे तालुक्याभरात सामाजिक, पर्यावरणीय व जनजागृतीचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे, असे तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी सांगितले.
