दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी दिव्यांग व्यक्तीसाठी ५ % दिव्यांग सेस निधीतून दिव्यांगासाठी ” पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार स्वंयरोजगार मेळावा” जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक, आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी पंचायत समिती, नाशिक कार्यालय आवार या ठिकाणी दिव्यांगासाठी नोकरी आणि स्वंयरोजगार इच्छुक उमेदवारांकरीता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या / नियोक्ते दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. नाशिक येथे उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. तसेच जिल्हयातील विविध महामंडळे स्वंयरोजगाराच्या योजनाची माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार आहे.
सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता व या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा दिव्यांग लाभार्थ्यांचे वय १८ ते ४५ असावे, दिव्यांग लाभार्थी हा ग्रामिण भागातील असावा, दिव्यांग लाभार्थ्याकडे किमाण ४० टक्के दिव्यांगत्वाचे युडीआयडी (स्वावंलबन कार्ड) असावे, दिव्यांग व्यक्ती मेळावा २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीसाठी असेल. दिव्यांग व्यक्ती यास वाचता व लिहता येणे आवश्यक असेल, दिव्यांग लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक हा आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅप्लाय करावे.
भरती इच्छुक नियोक्ते यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपण आपल्या आस्थापनेवर जास्तीत जास्त दिव्यांगासाठी रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शनवर Click करुन Nashik “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी व दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. सदर मेळावा जिल्हा परिषद ५ % सेस दिव्यांगांच्या निधीतून राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि दिव्यांग बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती अशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांनी केले आहे.
