डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कुशेगावमध्ये मोफत शालेय बॅग वाटप कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा.

आज दिनांक 16 एप्रिल रोजी कुशेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल कुशेगाव या शाळेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. युवराज भाऊ प्रभाकर सोनवणे यांच्या प्रयत्नातून युनियन बँक ऑफ इंडिया SC, ST एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी युनियन बँक ऑफ इंडिया चे सिनियर मॅनेजर प्रवीण पगारे, चेअरमन मंगेश शाम कुवर, हेमंत आवारी, मंगेश गावंडे, निलेश धुर्वे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक कासार सर, ठाणगे सर, निकम सर, निरभवनी मॅडम तसेच समाजसेवक शंकरभाऊ सोनवणे पो. पाटील, देविदास सोनवणे, राजू सोनवणे, नवसु खडके, अरुण सोनवणे, उत्तम सोनवणे, समाधान गांगुर्डे आदी मान्यवरांनी देखील कार्यक्रमास उपस्थिती लावली.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी व सामाजिक उत्तरदायित्व जपले जावे हा उद्देश असून उपस्थित सर्वांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *