विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृति पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा संपन्न.

बातमी शेअर करा.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब तसेच सामाजिक न्याय राज्य मंत्री महाराष्ट्र श्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हस्ते दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 .00 वाजता मंगलमय वातावरणात इगतपुरी शहरातील रेल्वे स्टेशन जवळील लोयारोड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा करण्यात आला.

शनिवार दि. 16 जानेवारी 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्षाच्या नाशिक मतदार संघातील आपल्या पक्षातील निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवारांसाठी पहिली प्रचार प्रसार सभा इगतपुरी येथील पोस्ट ऑफिस व लाकडी वखार चे समोर मोकळ्या पटांगणात सभा आयोजित करण्यात आली होती.त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई येथून मुंबई ते नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस या गाडीने सायंकाळी 8 .00 वाजता त्यांचे आगमन झाले होते.त्यावेळी सुमारे दोन हजार सर्व जाती धर्माचे लोक आले होते .त्याच प्रसंगाचे स्मरनार्ध इगतपुरी शहरातील सर्व नगरसेवक, कार्यकर्ते , दानशूर व्यक्ती , आंबेडकरी विचार मानणाऱ्या व्यक्तींनी सन 1970 साली माननीय श्री मिठा देवजी गोहिल नगराध्यक्ष यांचे हस्ते अर्धाकृती पुतळा लोया रोड येथे स्थापन करण्यात आला होता. त्याच अर्ध पुतळ्याचे पूर्णाकृती पुतळ्यात नूतनीकरण करण्यात येऊन दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी इगतपुरी नगर परिषद प्रशासन मधील सर्व प्रशासकीय अधिकारी व सर्व नगरसेवक मार्फत पूर्णाकृती पुतळा स्थानापन्न करण्यात आला .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7.00.वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले साहेब ,सामाजिक न्याय राज्य मंत्री श्री संजय शिरसाट साहेब , आमदार श्री हिरामण खोसकर साहेब , माजी खासदार प्राध्यापक श्री जोगेंद्र कवाडे साहेब, खासदार श्री राजाभाऊ वाजे साहेब, आमदार श्रीमती देवयानी ताई फरांदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या प्रसंगी श्री रामदास आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इगतपुरी शहराच्या भजीचा गरमा गरम आस्वाद आणि इगतपुरी शहराचा व येथील सर्व पक्षीय आणि स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा खूप खूप अभिमान आहे असे मत व्यक्त केले.सामाजिक न्याय राज्य मंत्री श्री संजय शिरसाट यांनी इगतपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या संस्थेस भरघोस आर्थिक मदत देण्यात येईल अशी उस्पूर्थ घोषणा केली.आमदार श्री हिरामण खोसकर यांनी आपल्या मनोगतात भावूक होऊन सांगितले कि मी आमदार झालो ते केवळ आणि केवळ भारतीय संविधान आणि आरक्षण यामुळेच तसेच खासदार श्री राजाभाऊ वाजे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा समाज निर्माण केला पाहिजे असे मत व्यक्त केले. प्राध्यापक श्री जोगेंद्र कवाडे साहेब यांनी इगतपुरी येथील अनेक कार्यकर्ते याची वाहवा करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर समाज निर्मिती केली पाहिजे असे मत व्यक्त केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यासाठी इगतपुरी नगर परिषद सर्व प्रशासकीय अधिकारी ,कामगार वर्ग ,आरोग्य अधिकारी सेवक वर्ग ,सर्व नगर सेवक,विश्र्वभूषण स्मारक समिती, नागरी नियोजन समिती इगतपुरी यांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य लाभले .हा लोकार्पण सोहळा संपन्न आणि यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा उभारण्यात प्रशासकीय अधिकारी श्री सोमनाथ आढाव,प्रशासकीय अधिकारी ओमकार पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष श्री नईम खान,उपअध्यक्ष श्रीमती सीमा जाधव,खजिनदार श्री उमेश कस्तुरे, सचिव श्री सुनील रोकडे, सदस्य श्री युवराज भोंडवे, माजी नगराध्यक्ष श्री संजय इंदुलकर . सामाजिक कार्यकर्ते माजी नगर सेवक श्री शशिकांत उबाळे, सुगत बुद्ध विहार अध्यक्ष श्री भास्कर बर्वे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष श्री दिनकर उघडे,पोलिस अधिकारी त्यांचे कर्मचारी ,स्थानिक सर्व राजकीय पक्ष, सामाजिक पक्ष , संघटना ,आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारे लोकशाही पद्धतीवर अंमल करणारे लोकप्रतिनिधी आणि समाज घटक यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

लोकराज्य प्राईम न्यूज मुख्य संपादक

सुनील पगारे . माणिकखांब.इगतपुरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *