प्रधानमंत्री पोषनशक्ती योजने अंतर्गत पंचायत समिती इगतपुरी मार्फत पाककलाकृति स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा जिल्हा परिषद शाळा गिरणारे इगतपुरी या ठिकाणी करण्यात आली. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाकी महिला यांनी सहभाग नोंदविला होता. तालुका स्तरीय पाक कलाकृती स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा माणिकखांब शाळेच्या स्वयंपाकी सौ. कविता पांडुरंग लायरे यांनी पाक कला कृती स्पर्धेत भारतीय तृणधान्य पासून मोमोज तयार केले होते. त्यांनी इगतपुरी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला.बक्षीस रुपी त्यांना पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. मागील वार्षिक स्पर्धेत सौ. कविता यांचा द्वितीय क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेत शाळेतील शिक्षिका श्रीमती प्रतिभा करसाळे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र मोरकर, SMC अध्यक्ष श्री नवनाथ चव्हाण आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
प्रधानमंत्री पोषनशक्ती योजने अंतर्गत पाककलाकृति स्पर्धा आयोजित;सौ. कविता पांडुरंग लायरे तालुक्यातून प्रथम क्रमांक
