काळू गांगुर्डे, त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे तळेगाव येथे दिनांक 28 जुलै 2025 ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन प्रक्रिया मोठ्या उत्साहात राबविण्यात आली.
या पाच दिवसीय कार्यक्रमामध्ये प्रभात फेरी, गाव बैठक, शिवार फेरी, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धा, महिला सभा आणि विशेष ग्रामसभा अशा विविध उपक्रमांद्वारे ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला. यावेळी ग्रामविकासासाठी नियोजित कृती आराखडा तयार करण्यात आला.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. बांबळे साहेब व मंडळ कृषी अधिकारी श्री. दिघे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी गावचे सरपंच बोरुबाई पारधी, उपसरपंच भागवत गांगुर्डे, ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, कृषिताई, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते काळूभाऊ गांगुर्डे, नारायण पारधी, सुधाकर बुरुंगे, गंगाराम झोले, भारत पारधी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उप कृषी अधिकारी माननीय थेटे साहेब यांनी कृषी संजीवनी योजनेची सविस्तर माहिती दिली.तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पाटील मॅडम, मेधने मॅडम, बहिरम साहेब, हिले मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी, आणि सहाय्यक कृषी अधिकारी धीरज बागुल यांचीही उपस्थिती होती.
हा कार्यक्रम गावाच्या सर्वांगीण कृषी विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, लोकसहभागातून योजनांचा यशस्वी अंमलबजावणीस दिशा मिळाली आहे.
