(इगतपुरी प्रतिनिधी)
आज ईगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी माणिकखांब येथे भेट देऊन मुंबई आग्रा महामार्गा चे नवीन रुंदीकरनामुळे गावातील ग्रामस्थच्या समस्या जाणून घेतल्या , यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते. तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील नागरिकांना मुंढेगावच्या दिशेने येताना सर्विस रस्ता बनवुन देने त्यामुळे पुला खालुन थेट गावात प्रवेश करता येईल.
आज हजारो गावातील तरुण कंपनी मधुन काम करुन आल्या नंतर, सर्विस रस्ता नसल्याने महामार्ग पार करून गावात प्रवेश करत असताना आज पर्यंत अनेक अपघात होऊन कायमचे अपंगत्व आलेले आहे.काही ना तर आपला जीव सुध्दा गमवावा लागला आहे. सर्विस रस्ता बनवल्यास राष्ट्रीय महामार्ग ओलंडण्याची गरज भासणार नाही तसेच नवीन रुंदीकरण मुळे जी स्मशानभुमी तुटणार आहे, ती नवीन बनवुन देने त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांचे ज्या पाईप लाईन चे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई चौवीस तासात देणे. असे आमदार हिरामन खोसकर साहेब व राष्ट्रीय महामार्ग क्रमां क 3 अधिकारी यांच्या सोबत सांगताना पंचायत समिती ईगतपुरी माजी सभापती विष्णुपंत चव्हाण, गोरख पांडुरंग गतीर, वसंत चव्हाण, चांगदेव चव्हाण, माणिकखांब ग्रामसेवक समाधान सोनवणे अश्या मागण्या यावेळी आमदार हिरामण खोसकर साहेब यांच्या समोर लेखी निवेदन च्या माध्यमातून देण्यात आल्या.
आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित अधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन कुठल्याही प्रकारची ग्रामस्थ ची गैरसोय होऊ नये अशा सुचना देण्यात आल्या. यावेळी मा .ग्रा प . सदस्य शाम चव्हाण, आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण , मनोहर चव्हाण, वसंत चव्हाण, बबन चव्हाण , रमेश चव्हाण , शेतकरी कैलास चव्हाण, भुषण चव्हाण , उमेश भटाटे आदी उपस्थित होते. तसेच खंबाळे शिवारात दिंव्याग शेतकरी सुनिल धर्माजी पगारे गट क्रमांक 623 मध्ये यांच्या शेतात वडीलो पार्जीत असलेली पाण्याची तिन परस 21 फुट विहीर व चार जांबळीचे मोठे झाड व चार फेरूचे झाड 1 अंबा चे व 4 गुंठे ( 400 चौरस मीटर ) राष्ट्रीय महामार्ग क्र 3 संपादित केले परंतु अद्यापही विहीर व झाडे यांचे कुठ लाही विचार केला नाही . शेतकराची फार नुकसान झाले आहे . तसेच खंबाळे गट क्रमाक 621 रमेश किसन चव्हाण यांची वडीलो पार्जीत जागे मध्ये विहीर आहे संपादित केली आहे .तरी दोन्ही शेतकर्यांची दखल किंवा विचार केला गेला नाही. अश्या सर्व बाबीवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा
