घोटी शहर | दिनांक – २० जुलै २०२५भारतीय बौद्ध महासभा शाखा – घोटी शहर महिला कार्यकारणी यांच्या वतीने वर्षावास २०२५ प्रवचन मालिकेतील पुष्प ३ रे रविवार, दि. २० जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वा. नालंदा बुद्धविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, घोटी येथे धम्ममय वातावरणात पार पडले.
या प्रवचनाचा मुख्य विषय होता – “भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत”.या विषयावर केंद्रीय शिक्षक आयु. मनोज मोरे गुरुजी (संरक्षण सचिव नाशिक पश्चिम) यांनी कुशल व अकुशल कर्माचे अर्थ, उदाहरणे तसेच इतर धर्म आणि बौद्ध धर्मातील तत्त्वांतील फरक याचे मार्मिक विवेचन केले. नीतीवर आधारित बौद्ध धम्माचे यथार्थ दर्शन त्यांनी घडवले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा व भीमस्मरण यांनी झाली. दीप, धूप व पुष्प पूजा करत आयु. वामनराव कांबळे, आयुनी. शकुंतलाताई कांबळे, आयु. अर्जुन वामनराव कांबळे, आयुनी. मनिषाताई अर्जुन कांबळे (भोले), आयु युग अर्जुन कांबळे व भोले परिवार यांनी गुरूजींचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयुनी. सुनिताताई भोले (संघटक, घोटी शहर) यांनी केले.
प्रवचनानंतर आयु लक्ष्मण भोले आणि आयुनी मनिषाताई कांबळे (भोले) यांनी आयु. मनोज मोरे गुरुजी यांना धम्मदान दिले आणि सर्व उपस्थितांना खीरदान देण्यात आली. आयु लक्ष्मण भोले व आयु संतोष भोले यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत व आभारप्रदर्शन केले.त्याचप्रमाणे आयु. मनोज मोरे गुरुजी (केंद्रीय शिक्षक),आयुनी मीनाताई पंडित (केंद्रीय शिक्षिका – घोटी),आयुनी वंदनाताई रूपवते (अध्यक्ष – घोटी शहर),आयु प्रकाश रूपवते (केंद्रीय शिक्षक),आयु प्रभाकर चिकणे (बौद्धाचार्य),आयु अनिकेत उबाळे (बौद्धाचार्य),आयु राहुल शिंदे (बौद्धाचार्य),आयु बाळू रूपवते,आयु लक्ष्मण भोले,आयु देविदास भोले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमात आयुनी सुप्रियाताई रूपवते (कोषाध्यक्ष – घोटी शहर),आयुनी संगीताताई मोरे (समता सैनिक – इगतपुरी),आयुनी मथुराताई कोळे (उपाध्यक्ष – संस्कार, घोटी),आयुनी कल्पनाताई दिवेकर (संस्कार सचिव – घोटी),आयुनी रमाताई पटेकर (संस्कार सचिव – घोटी),आयुनी कल्पनाताई रूपवते (संरक्षण उपाध्यक्ष – घोटी),आयुनी मालतीताई रूपवते (संरक्षण सचिव – घोटी),आयुनी सुनिताताई भोले (संघटक – घोटी),आयुनी लंकाताई वाहुळे (संघटक – घोटी),आयुनी ललिताताई भोले (संघटक – घोटी),आयुनी पुष्पाताई रोकडे (संघटक – घोटी),आयुनी चंदाताई चिकणे,आयुनी जयश्रीताई रुपवते,आयुनी सुरेखाताई आहिरे,आयुनी राधाबाई रूपवते,आयुनी विमलबाई रूपवते,आयुनी सुनीताताई रूपवते,आयुनी लीलाबाई रूपवते,आयुनी रंजनाताई रूपवते,आयुनी कमलताई भोले,आयुनी नेहाताई भोले,आयुनी मंजुषाताई भोले,आयुनी देविकाताई भोले,आयुनी माहीताई भोले,आयुनी प्रांजलताई कांडेकर,आयुनी अनिताताई भोले,आयु संतोष भोले,आयु रोहित पंडित,आयु रोहन रूपवते,आयु आनुष भालेराव,आयु प्रसेंजित रूपवते,आयु अक्षय रूपवते,आयु सिद्धार्थ रूपवते आदी मान्यवर व उपासक-उपासिका सहभागी झाले होते.
