महिलांच्या शिरपेचात मानाचा तुरा ; 138 किलो वजन उचलून सुवर्ण पदकाला गवसणी

Oplus_131072

बातमी शेअर करा.

जागतिक महिला दिना निमित्त आज महिलांच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळविला . ओडिसा येथे पार पडत असलेल्या७ व्या नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत (7th NATIONAL MASTER GAMES,ROULKELA,ODISHA) मध्य रेल्वे मधील भुसावळ डिव्हिजन येथील ओढा स्टेशन येथे कार्यरत असलेल्या कॉम अश्विनी आंबेकर, सहाय्यक स्टेशन मास्तर (DYSS) यांनी ७१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले, त्यांनी snatch या प्रकारात 63 किलो वजन व clean and Jerk या प्रकारात 75 किलो वजन असे एकूण 138 किलो वजन उचलून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.मध्य रेल्वेतील सर्व विभागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन नाशिकरोड ओपन लाइन शाखेतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *