भारतीय बौध्द महासभा, नाशिक जिल्हा व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनमहामोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाला भालेकर मैदान ते शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. कालिदास कला मंदिर मार्गे रेडक्रॉस सिग्नल , मेहेर सिग्नल मार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले . बोधगया महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करा, बोधगया महाबोधी महाविहारचे नियंत्रन आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेवुन बौद्धांच्या ताब्यात द्यावे अश्या मुक्त आंदोलनाचा मुख्य मागण्या करण्यात आल्या. मोर्चात सहभागी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच संपूर्ण नाशिक जिल्हातील व बौध्द-आंबेडकरी जनता मोर्चात सहभागी झाले.

यावेळी उपस्थित वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे , वामनराव गायकवाड , संजय साबळे , अविनाश शिंदे, बाळासाहेब शिंदे, आनिकराव गांगुर्डे, एम .आर . गांगुर्डे, मनोज मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव सरचिटणीस शरद भोगे व अध्यक्ष रितेश जी गांगुर्डे शहराध्यक्ष चौदास भालेराव, पी .के . गांगुर्डे , पी .के . जगताप , शांताराम उबाळे, सरपंच शरद सोनवणे, अँड भारत बुकाणे, अँड अमर भरीत , तालुका अध्यक्ष विक्रम जगताप उर्मिला गायकवाड, संगिता शेलोरे, विजया बर्वे, सविता पवार, रंजना साबळे, प्रभाकर चिकणे, मधुकर कडलक, संजय सोनवणे , बळीराम शिरसाठ, चेतन पगारे, डॉ गाडे , मधुकर बागुल, दादाभाऊ शिरसाठ , नंदुभाऊ पगारे, मिलिंद शिंदे , तुकाराम पवार, रमेश जाधव, साहेबराव पालवे, संजय शेजवळ, सनी जाधव ,रत्नाकर साळवे ,संस्कार सचिव मनोज गाडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल , पर्यटन उपाध्यक्ष प्रकाश जगताप आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
