नासिक-मुंबई आग्रा महामार्गावर व्हि.टी.सी. फाट्याजवळ आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एक दुचाकी अपघात झाला. मुंबईकडून नाशिककडे जात असलेली MH.17.BH.1278 ही मोटरसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये डॉ. भावेश शेलार (वय 35) हे गंभीर जखमी झाले असून चेतन (वय 45, रा. नाशिक) हे किरकोळ जखमी झाले आहेत
अपघात होताच घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान यांच्या गोंदे फाटा येथील मोफत रुग्णवाहिका सेवेने दोघा जखमींना तात्काळ नाशिकमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताचे प्राथमिक कारण हे वाहनावरील ताबा सुटणे असल्याचे दिसून आले आहे. महामार्गावर वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी केले आहे.
