हरीश तूपलोंढे (प्रतिनिधी)
श्रीराम शक्तिपीठ संस्थान व चाकोरे बेझे ग्रामस्थ यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे या ही वर्षी पर्व स्नानाचे आयोजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव मंदिर व चैतन्य हनुमान मंदिर वर्धापनदिन निमित्ताने तसेच ब्रम्हचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था यांच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येते.या पर्व स्नानास परिसरातील संपूर्ण पंचकोशीतील भाविकांनी हजेरी लावून पर्व स्नानाचा आंनद घेतला.या पर्व स्नानास स्वता श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे पीठाधीश्वर राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज यांनी सहभाग घेतला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून या पर्व स्नानाची प्रथा निर्माण झाली असून, या पर्व स्नानाचा आंनद परिसरातील भाविक घेत आहे.या पर्व स्नानास त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाडयातील महन्त,संत, ठाणापती यांनी हजेरी लावली.तसेच लोकप्रिय आमदार मा.श्री हिरामणजी खोसकर साहेब यांची विशेष उपस्थित या सोहळ्यास लाभली होती.या ब्रम्हमय शाही पर्व स्नानास महन्त सिध्देश्वरानन्द सरस्वतीजी महाराज, महन्त श्रीनाथानन्द सरस्वती महाराज, महन्त सुदर्शनानंद सरस्वती महाराज, महन्त रामानंद सरस्वती महाराज, महन्त विश्वेश्वरानन्द सरस्वती महाराज, महन्त शिवानन्द सरस्वती महाराज, ठाणापती महन्त विष्णुगिरीजी महाराज जुना अखाडा, ठाणापती महन्त धनंजयगिरीजी महाराज निरंजनी अखाडा, ठाणापती महन्त महेंद्रगिरीजी महाराज जुना अखाडा सर्व दहा ही अखाडयाचे महन्त,साधु, संत उपस्थित होते.

तसेच इतर क्षेत्रातील विनायक माळेकर,बहिरु मुळाणे,सरपंच कैलाश पेटिंदे, उप-सरपंच मा.श्री.अशोक चव्हाण,मा.श्री.रंगनाथ भाऊ तुपलोंढे,मा.श्री.राजाराम चव्हाण, मा.श्री.सुरेश चव्हाण, हरीभाऊ आलवणे, तुकाराम मुकणे, जगन आचारी, समाधान शेवरे (पोलीस), अशोक बदादे, सचिन बदादे,अंबादास लिलके,रोहीदास मुकणे,पो.पा सोमनाथ खाडे,बाळु शेवरे, भाऊराव चव्हाण,गंगाराम चव्हाण, समाधान आलवणे, मोहन मुकणे, संदीप पोटींदे, राजू शेवरे,व इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. मा.श्री.प्रमोदजी कांबळे (चित्रकार,शिल्पकार, ) , मा.श्री.प्रशांत धर्माधिकारी साहेब,(उपायुक्त पशुसंवर्धन विभाग नाशिक, ) , मा.श्री.शातांरामजी देशमुख सर (प्राचार्य पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय,पाडळी ) , मा.डाॅ.श्री.सचिन विभांडीक , मा. श्री. किरणजी पाटील (श्री राजलक्ष्मी गोशाळा तपोवन, ) या सर्व मान्यवरांना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराजांनी सांगितले की येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा असून चांगल्या पद्धतीने शासन नियोजन करणार आहे.साधू शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
