पवन पगारे (नाशिक रोड प्रतिनिधी)
०२ मार्च २०२५ श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मंगल मैत्री दिनानिमित्त रविवार दिनांक ०२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे होणाऱ्या “बौद्ध धम्म परिषदेचे आमंत्रण” महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसह इतर मंत्री महोदय आमदार व विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. रिपाई नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे, भदंत सुगतजी महाथेरो, महिला सीमाताई हिरे, संतोषजी कटारे, अमोलजी पगारे, मनलीताई जाधव, रामबाबाजी पठारे, नारायणजी गायकवाड, समाधानजी जगताप, बाळासाहेब सोळसे, रमेशजी निखाडे, उपस्थित होते.बौद्ध धम्म परिषदेसाठी ११ ते १२ विविध देशातील बौद्ध धम्मगुरु उपस्थित राहणार असल्याने बौद्ध धम्म परिषदेस ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय धडाकेबाज महागायक “साजनजी बेंद्रे”, शिंदे शाही बाणा, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोराला फेम-महा गायिका- “मंजुषाताई शिंदे”, मला तुझ्या रक्ता मधला भीम पाहिजे-फेम महाराष्ट्राच्या महा गायिका “भाग्यश्रीताई इंगळे”, गावामध्ये गाव आहे ते महू गाव व सारेगाम फेम – गायक “संतोषजी जोंधळे” यांचा धम्मगीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे . “बौद्ध धम्म परिषद” पक्ष संघटना विरहित असल्याने आपण सुद्धा पांढरा पोशाख परिधान करून सामील व्हावे हेचं विनम्र आवाहन महेंद्रजी सोनवणे , आकाशजी घुसळे, मंगेशजी मोकळ, सागरजी (सन्नी) सोनवणे, प्रवीणजी रोकडे, मिलिंदजी तायडे यांनी केले
